शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: ढाका , सोमवार, 4 ऑगस्ट 2008 (15:49 IST)

ढाक्यात इमारतीस आग लागून अकरा ठार

बांगलादेशातील ढाका येथे पाच मजली इमारतीत आग लागून झालेल्या अपघातात अकरा जण ठार झाले तर इतर जखमी झाले आहेत. जुन्या शहरातील इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास जोड्याच्या दुकानास आग लागल्यानंतर इतर मजल्यांवर आग पोहचली.

यावेळी इमारतीत राहणारे लोक गाढ झोपेत होते. आतापर्यंत जळालेले दहा मृतदेह काढण्यात आले असून पाच गंभीर भाजलेल्या व्यक्तींना रूग्णालयात पाठवण्यात आल्याचे अग्निशमक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

दुकानात ठेवण्यात आलेल्या रसायनामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमनदल घटनास्थळी पोहचल्यानंतर तासभरात आग आटोक्यात आली. इमारतीत आग पसरल्यानंतर एकच गोंधळ माजला.

इमारतीत राहणारे रहिवास्यांनी बाहेर पडण्यासाठी छतावर चढण्यासोबतच बाजूच्या इमारतींवर उड्या मारून सुटकेचे प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.