शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

ब्रिटनमधील 59 टक्के भारतीय विद्यार्थी बनावट

ब्रिटनमध्ये वर्ष 2011मध्ये एकूण 63,000 विद्यार्थी आले आणि एकूण भारतीय विद्यार्थ्यांपैकी 59 टक्के विद्यार्थी बनावट असल्याची माहिती एका संस्थेने बुधवारी जारी केली.

मायग्रेशन वॉच यूके या संस्थेने केलेल्या गृह विभागाच्या पथदर्शी योजनेतील निष्कर्षांवर आधारित अभ्यासात म्हटले आहे, की सर्वाधिक बनावट विद्यार्थी म्यानमारमधील आहेत. त्यांचा आकडा 62 टक्के एवढा आहे. त्यानंतर भारत, बांगलादेश आणि नायजेरिया यांचा क्रम लागतो. या देशातील 59 टक्के विद्यार्थी बनावट आहेत. पथदर्शी योजनेंतर्गत व्हिसा साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची ते खरोखरच विद्यार्थी आहेत का, हे जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते.