सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम यंदाच्या स्पर्धेमध्ये कोण मोडणार?

IPL 14
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:14 IST)
आयपीएलचा 14 वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असे अनेक विक्रम पाहिले आहेत जे क्षणात बनले आणि क्षणात मोडले गेलेही. असाच एक विक्रम आहे तो म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा. यंदाच्या हंगामात जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडेल याकडेही क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे.
जलद अर्धशतकवीर
के. एल. राहुल
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सध्या

तरी पंजाब किंग्जचा के. एल. राहुल याच्या नावावर आहे. त्याने
2018 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने या डावात 16 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. त्वरत
त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते.

युसूफ पठाण आणि सुनील नारायण
सर्वात वेगवान अर्धशतकाच्या यादीत दुसर्यार स्थानावर असलेल्या युसूफ पठाणने 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते तर 2017 मध्ये सुनील नारायणने 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसे बघायला गेले तर दुसर्याय स्थानावर या दोघांचीही दावेदारी आहे. पण, युसूफपठाणने या वेगवान अर्धशतकाचे रुपांतर मोठ्या खेळीत केले. त्याने हैदराबादविरुद्ध 22 चेंडूत 72 धावा ठोकल्या. दुसर बाजूला नारायणला आपल्या अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. त्याची आरसीबीविरुद्धची ही आक्रमक अर्धशतकीय खेळी 17 चेंडूत 54 धावांत आटोपली. त्यामुळे पठाणच्या या अर्धशतकाचे महत्त्व किंचित जास्त आहे.
सुरेश रैना
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 2014 च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 87 धावांची खेळी करताना 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याचे हे अर्धशतक आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.

ख्रिस गेल
आयपीएलमध्ये षटकारांचा बादशाह म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे ख्रिस गेल. गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. ही आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. ही खेळी करतानाच गेलने 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याचे हे अर्धशतक आयपीएल इतिहासातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक म्हणून गणले जाते.


यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर
चेन्नईचा दिल्लीविरोधात पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला ...

IPL-2021 : आज राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सामना

IPL-2021 : आज राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सामना
भारतात सध्या आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन ...

KKR vs SRH: मनीष पांडे यांचा संघर्ष वाया गेला, कोलकाताने ...

KKR vs SRH: मनीष पांडे यांचा संघर्ष वाया गेला, कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले
केकेआरने आयपीएलच्या 14 व्या सत्रात हैदराबादला पहिल्या सामन्यात 10 धावांनी पराभूत केले. या ...

IPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, ...

IPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, दिल्लीने चेन्नईला 7 गडी राखून पराभूत केले
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021च्या दुसर्याद सामन्यात दिल्ली कॅपिटलने शनिवारी चॅम्पियन ...

CSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा ...

CSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा सामना
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स व महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई ...