शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

वेगवान शतक ठोकल्यानंतर गेलने रात्रभर केली पार्टी

WD
मंगळवारी एतिहासिक खेळी केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू ख्रिस गेलने रात्रभर पार्टी केली. (पाहा, पार्टीत कसा बेधुंद होतो गेल) पहाटे चार वाजताच्या दरम्यान त्याने टिवट केले की, माझा फोन अजूनही थांबयचे नाव घेत नाही. मी अजूनही पार्टीत आहे. आता मी झोपण्याचा प्रयत्न करणार आहे. गेलच्या या तुफानी खेळीचे विजय मल्ल्या यांनीही कौतूक केले आहे.

गेलने पुणे वॉरियर्स विरुद्ध मंगळवारी सर्वाधिक वेगवान शतक ठोकून क्रिकेट प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. बंगळुरुचे चेन्नास्वामी स्टेडियम या ऐतिहासीस खेळीचे साक्षीदार ठरले. पासामुळे काहीवेळ खेल थांबवण्यात आला होता. पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर गेलने चौकार-षटकारांचा जो पाऊस पाडला तेव्हा त्याला रोखणे पुणे संघाला शक्यच झाले नाही.गेलने तुफान फलंदाजी करत केवळ ३० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीने टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा (ब्रँडन मॅक्लूम १५८) आणि सर्वाधिक षटकारांचा (ग्रॅहम नेपिअर १६) विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावांची एतिहासिक खेळी केली. गेलच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर बंगळुरुने २६३ धावांचा डोंगर उभा केला आणि पुणे वॉरियर्सवर सहज मात केली.गेलने पहिल्या ५० धावा १७ चेंडूत पूर्ण केल्या. त्यानंतर केवळ १३ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. गेलने ८ चौकार आणि ११ गगनचुंबी षटकारांनी शतक साजरे केले. या शतकाने गेलने टी-२० मधील सर्वाधिक वेगवान शतक केले. त्याच्या आधी हा विक्रम अँड्यू सायमंडच्या नावे होता. सायमंडने केंट काँऊटीकडून खेळताना २००४ मध्ये ३४ चेंडूत शतक ठोकले होते. गेलने ९ वर्षानंतर हा विक्रम मोडला आहे.