शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

व्हॉट्स अँप, बीबीएमवरून झाले फिक्सिंग

WD
आयपीएल-6 मध्ये ‘स्पॉट फिक्सिंग’ करण्यासाठी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांनी ‘ब्लॅकबेरी मेसेंजर’ आणि ‘व्हॉट्स अँप’चा वापर केल्याचे समजतें कुठलाही रेकॉर्ड मागे राहू नये आणि आपला ‘व्यवहार’ आपल्यातच राहावा, यादृष्टीने त्यांनी ही ‘खेळी’ केली होती, पण पोलिसांनी त्यांच्याच ‘गेम’ केला.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक जवळपास 70 मोबाइलवर ‘वॉच’ ठेवून होते. व्हॉट्स अँप आणि बीबीएमवरून फिरणार्‍या मेसेजवर त्यांचे विशेष लक्ष होते. याची कल्पनाच बुकींनी किंवा क्रिकेटपटूंनी केली नव्हती. या दोन्ही सेवा अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित मानल्या जात असल्याने ते बिनधास्त होते. इथेच ते फसले आणि अगदी सहज पोलिसांच्या सापळ्यात अडकले.