शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

गत पराभवामुळे डोळे उघडले : धोनी

WD
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने बुधवारी सनरायजर्स हैद्राबादवर मिळालेल्या चांगल्या विजयानंतर सांगितले की, मुंबई इंडियंसने पराभूत झाल्यानंतर त्याच्या संघाचे डोळे उघडले त्यामुळे त्याने या सामन्यात चमकदार प्रदर्शन केले.

धोनीने सामना समाप्त झाल्यानंतर सांगितले, मी पूर्वी देखील म्हटले होते की, आम्ही गत सामन्यात खेळलोच नव्हतो. आमचा प्रयत्न नगण्य होता. तो आमच्यासाठी डोळे उघडणारा राहिला.

उल्लेखनीय आहे की, दोन वेळाचा चॅम्पियन सुपर किंग्सने राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीए) ५४व्या सामन्यात सनरायजर्सला ७७ धावांनी पराभूत केले.

सुपर किंग्सने सनरायजर्ससमोर २२४ धावांचे विशाल ध्येय ठेवले होते ज्याचा पाठलाग करताना यजमान संघ २० षटकात आठ बाद १४६ धावा बनवू शकला.सुपर किंग्सचा १३ सामन्यात हा १०वा विजय आहे तसेच सनरायजर्सला पाच पराभव मिळाले. त्याने १२ सामने खेळले आणि सात विजयासह १४ अंक घेवून गुणयादीत पाचव्या स्थानावर आहे परंतु त्याचे एकुण नेट रन त्रस्त झाले आहे.धोनीने सांगितले की, सुरेश रैनाने नाबाद ९९ धावा बनवून संघाला शक्ती दिली या गोष्टीवर तो आनंदी आहे परंतु रैना आपले दुसरे शतक पूर्ण करू शकला नाही या गोष्टीचे

त्याला दु:ख आहे. कर्णधारानुसार रैनासाठी आनंदी आहे आणि सोबत दु:खी देखील. त्याचे शतक पूर्ण न होणे दु:खाचे कारण आहे. माइकल हसीने चांगली खेळी खेळली. तो आपल्या शैलीमध्ये एखाद्या बदलाशिवाय सतत जबरदस्त खेळी खेळत आहे. याप्रकारची खेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रवीड खेळतो.