PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या

BGMI game
Last Modified शुक्रवार, 2 जुलै 2021 (11:41 IST)
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून करण्यात आली आहे. हा गेम 2 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता भारतात लाँच झाला आहे. हा PUBG Mobile चा इंडियन वर्जन गेम आहे. गेम प्री-रजिस्टर्ड यूजर्सला आधीपासूनच डाउनलोडसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता Battlegrounds Mobile India गेमचे डेवलपर्स krafton ने Battlgrounds Mobile India च्या ऑफिशियल वर्जनच्या डाउनलोडिंगची घोषणा केली आहे.
गेम संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Google Play Store वरून गेमर्स ते डाउनलोड करण्यात सक्षम असतील. दुसरीकडे, ज्या वापरकर्त्यांनी अर्ली अॅक्सेससाठी गेम डाउनलोड केला आहे त्यांना फक्त Google Play Store वरून गेम अपडेट करावा लागेल.

Battlegrounds Mobile India केवळ Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, iOS आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह डिव्हाइसला गेमसाठी थोडं थांबावं लागेल.
क्राफ्टनने हे स्पष्ट केले आहे की थर्ड पार्टी स्टोअर किंवा एपीके फाइलच्या मदतीने गेम डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम खेळणार्‍या वापरकर्त्यांना 19 ऑगस्टपर्यंत रिवार्ड प्वाइंट मिळतील. गेमच्या लॉन्चिंग सेलिब्रेशन ऑफरचा एक भाग म्हणून Krafton ने इन-गेम इवेंटची घोषणा केली असून, गेम खेळून रीडीम करता येईल.

Battlegrounds Mobile India ला मोबाइल ओटीपीच्या सहाय्याने लॉग इन करता येईल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेम खेळणार्‍या कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा संग्रहित केला जाणार नाही.

Battleground Mobile India गेम काही बदलांसह PUBG Mobile सारखा सादर करण्यात आला आहे. खेळाच्या पात्रातील पोशाख बदलला आहे. सोबतच ग्रीन ब्लडसह प्रस्तुत करण्यात आला आहे.

भारत सरकारने मागील वर्षी भारतात PUBG Mobile वर बंदी घातली होती. भारताची सुरक्षा, एकता आणि अखंडतेचा हवाला देत सरकारने चिनी अ‍ॅप तसेच PUBG वर बंदी घातली होती. तेव्हापासून, पब्जी मोबाइल भारतात पुनरागमन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

AUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ...

AUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या ...

मोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू

मोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू
अररिया, बिहारमधून मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. येथे एक कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात ...

आयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 ...

आयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले आहे.देशमुख ...

Gold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज ...

Gold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या
आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी, मल्टी कमोडिटी ...

पत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके ...

पत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या
नवी मुंबई- एका बापाने रागाच्या भरात आपल्याच चार वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक ...