ऑनलाईन शॉपिंग करताना आधी फर्जी वेबसाइट्सची ओळख करून घ्या
कुठल्याही अनोळख्या शॉपिंग वेबसाइटहून खरेदी करण्याअगोदर गूगलवर त्याच्याबद्दल माहिती काढणे फारच गरजेचे आहे. काही साईट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फारच कमी किमतीत चांगले उत्पाद दाखवते. ज्याने तुम्ही त्याच्या जाळात नक्कीच अडकून शकता. ह्या साईट दोन प्रकारे तुम्हाला नुकसान पोहचवू शकते. असे ही होऊ शकते की ती तुमच्याकडून ऑनलाईन पेमेंट आणि प्रॉडक्टची डिलीवरी कधीपण होणार नाही. दुसरे, बँक अकाउंट आणि दसरे महत्त्वाचे डेटाची चोरी होऊ शकतो. अशा प्रकारच्या फर्जी वेबसाइटद्वारे थोडी सावधगिरी बाळगली तर तुम्ही वाचू शकता.
1. वेबसाइटचे नाव सर्ज इंजनमध्ये टाइप करा आणि रिझल्टला फारच लक्षपूर्वक बघा. जर सर्च इंजनमध्ये वेबसाइट वर येत असेल आणि याच्याबद्दल कोणी चुकीचे कमेंट नसतील टाकले तर तुम्ही यावर भरवसा ठेवू शकता.
2. वेबसाइटचे कनेक्शन किती सिक्योर आहे. ब्राउझरच्या ऍड्रेस बारमध्ये बेवसाइटचे सिक्योरिटी स्टेटस बघा. https पानाला मुख्य करून सुरक्षित मानले जाते. पेमेंट पान तर https पासूनच सुरू व्हायला पाहिजे.
3. वेबसाइट कस्टमर स्पोर्ट किती देते. त्याच्या about us सेक्शनमध्ये बघा. कस्टमर केअरवर फोन करा.
4. जर डोमेन नावात बरेच डैश किंवा सिंबल असतील, डोमेन नेम दुसर्या वेबसाइटसच्या जवळपास आहे, डोमेन नावाचे एक्स्टेन्शन ..biz या ..info असेल तर त्यांच्याबद्दल माहिती करून घेणे फारच आवश्यक आहे.
5. वेबसाइटची डिझाइन, भाषा आणि व्याकरणाला व्यवस्थित बघा. जर याच्यात कुठलीही त्रुटी दिसली तर त्या साईटपासून दूर राहणेच योग्य.