बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (15:04 IST)

रात्री 11.30 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बंद राहील व्हाट्सएप? जाणून घ्या काय आहे सत्य

सोशल मीडिया आज बर्‍याच लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फेसबुक आणि व्हाट्सएप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मावर आम्ही बर्‍याच प्रकारचे मेसेज एक मेकनं पाठवत असतो. बर्‍याच वेळा आम्ही मेसेज न वाचताच त्याला पुढे पाठवतो, जे नंतर अफवांचे रूप घेऊन घेतात. सध्या व्हाट्सएपवर एक मेसेज वायरल होत आहे की दररोज रात्री 11.30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत व्हाट्सएप बंद राहणार आहे. या मेसेजमध्ये असे ही सांगण्यात येत आहे की जर तुम्ही या मेसेजला फॉरवर्ड केले नाही तर 48 तासात तुमचे व्हाट्सएप अकाउंट बंद होऊन जाईल आणि नंतर त्याला अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला 499 रुपये मोजावे लागणार आहे. तर जाणून घेऊ काय आहे या मेसेजची सत्यता ...
 
मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की भारतात आता व्हाट्सएपचा वापर रात्री 11.30 वाजेपासून पहाटे 6 पर्यंत होऊ शकणार नाही. या दरम्यान व्हाट्सएप पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मेसेजमध्ये असा ही दावा करण्यात येत आहे की मोदी सरकार व्हाट्सएपच्या वापराबद्दल लवकरच नवीन कायदा बनवणार आहे. मेसेजमध्ये असा ही दावा करण्यात आला आहे की पिक्चर अपडेट करण्यात त्रास होत आहे, पण कंपनी यावर काम करत आहे आणि लवकरच त्याचे सोल्युशन काढण्यात येईल. मेसेजमध्ये असे सांगण्यात येत आहे की या मेसेजला 10 लोकांना फॉरवर्ड करा, नाही तर 48 तासात तुमचे अकाउंट बंद होऊन जाईल आणि त्याला परत ऑक्टिव्ह करण्यासाठी 499 रुपये मोजावे लागणार आहे.  
 
वायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा किती सत्य आहे 
सर्वात आधी सांगायचे म्हणजे दूरसंचार आणि सूचना आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाने असल्या प्रकारचे कोणतेही नोटिस काढलेले नाही आहे. तसेच, कुठल्याही सोशल मीडिया कंपनीने या प्रकारचा कुठलाही आधिकारिक मेसेज दिलेला नाही आहे. अशात मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. म्हणून तुम्हाला या गोष्टीपासून घाबरण्याची काहीही गरज नाही की तुमचे व्हाट्सएप बंद होऊन जाईल आणि त्याला एक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. बुधवारी व्हाट्सएप ठप्प झाल्याने मोक्याचा फायदा घेण्यासाठी आणि लोकांना मार्गापासून दूर करण्यासाठी असल्या प्रकारची अफवा पसरवण्यात येत आहे.