गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (13:01 IST)

मोबाइलच्या खराब नेटवर्कुळे हैराण असाल तर करा हे उपाय!

अनेकजण नेहमीच स्मार्टफोनच्या खराब सिग्नलमुळे हैराण असतात. खराब सिग्नलमुळे कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटची स्पीड कमी होणे, आवाज नीट न येणे, मेसेज सेंड न होणे आणि ई-मेल न येणे यांसारख्या समस्या होतात. अनेकदा महत्त्वाच्या कामावेळी सिग्नल न मिळत असल्याने अनेकजण फस्ट्रेशनमध्ये जातात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमच्या मोबाइलचे सिग्नल आणखी मजबूत होतील. 
 
फोन कव्हर दूर करा
स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी कव्हर वापरणे योग्य आहे. पण याने सिग्नल पकडण्याची स्पीड प्रभावित होते. जेव्हा तुमच्या मोबाइलचं कव्हर खूप जाड असतं. त्यासोबतच फोन पकडताना अशी काळजी घ्या की, हँडसेटचा एंटीना बँड्‌स ब्लॉक होऊ नये. 
 
स्मार्टफोन आणि सेल टॉवरमधील अडथळा दूर करा
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, तुम्ही कशाप्रकारे सेलफोन आणि सेल टॉवर्समधील अडथळा दूर करु शकता. तुमच्या फोनला सेल टॉवरमधून सतत सिग्नल मिळत असतात आणि टॉवर्समधून येणारे सिग्नल्स अनेक अडथळे दूर करत येतात. पण फोनपर्यंत पोहोचेपर्यंत ते कमजोर होतात. त्यामुळे खिडकीत किंवा खुल्या जागेत या. मेटल किंवा काँक्रिटच्या भींतीपासून दूर राहा. फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर ठेवा.
 
सिम कार्ड चेक करा
अनेकदा अचानक सिग्नल जातात. सिम कार्डवर धूळ असल्याने किंवा काही तांत्रिक बिघाडामुळेही होऊ शकतं. सिग्नलची मजबुती यावर निर्भर असते की, तुम्ही कोणत्या सिम कार्डचा वापर करत आहात. योग्य ती काळजी न घेतल्याने फोनमध्ये धूळ जाते. सिग्नल खराब झाले असताना सिम कार्ड बाहेर काढा, स्वच्छ करा आणि पुन्हा फोनमध्ये लावा. असे केल्याने सिग्नल मजबूत होण्यास मदत मिळेल. असे न झाल्यास सिम कार्ड रिप्लेस करु शकता. कदाचित सिम कार्ड डॅमेज झालं असावं. 
 
योग्य ऑपरेटरची निवड
नेहमी समस्या फोनची नसते. अनेकदा ऑपरेटरचीही समस्या असते. जिथे तुम्ही राहता किंवा काम करता तिथेच नेटवर्क खराब असेल तर हे समजून जावे की, नेटवर्कमध्येच समस्या आहे. त्याच ऑपरेटरी सेवा वापरणार्‍या दुसर्‍या व्यक्तीलाही हीच समस्या येत असेल तर तुम्हाला नवीन नेटवर्क प्रोव्हायडर निवडण्याची गरज आहे. तुम्ही राहता त्या परिसरात ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे त्यांची सेवा घ्या. 
 
फोनची बॅटरी सेव्ह करा
कधीकधी फोन सिग्नल सर्च करण्यासाठी जास्त बॅटरी खर्च होते. बॅटरी कमी असेल तर सिग्नल मिळण्यासही अडचण होऊ शकते. अशावेळी फोनची बॅटरी कमी असेल तर काही अ‍ॅप्स, वाय-फाय आणि इतर कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स बंद करायला हवेत. 
 
ऑफ करा ऑन करा
कधी कधी फोन ऑफ करुन ऑन केल्यासही समस्या सुटू शकते. यासाठी कारण फोन ऑन झाल्यावर नव्याने तेच नेटवर्क शोधतं आणि त्याच टॉवरसोबत कनेक्ट होतं, ज्याचं सिग्नल स्ट्राँग आहे.