सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

जसवंतसिहांमुळे बंगालमध्ये उगवले कमळ

राजस्थानातून थेट पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या जसवंतसिंहांनी दार्जिलिंगमध्ये विजय मिळवून डाव्यांच्या बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविले.

लष्करातील माजी अधिकारी असलेले जसवंतसिंह भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यसभेत ते विरोधी पक्षनेतेही होते. गेल्या वेळी राजस्थानातून ते निवडणूक हरले होते. मात्र, पक्षाने त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी देत तेथील विरोधी पक्षनेतेपदही दिले होते. यावेळी ते निवडणूक लढविण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यांनी मार्क्सवादी नेते जी. बेश यांना दोन लाख ५३ हजार मतांनी पराभूत केले.