शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (00:59 IST)

नामशेष होऊ शकते व्हेलची खास प्रजात

समुद्रात सातत्याने वाढत असलेल्या रासायनिक प्रदूषणामुळे आगामी काही दशकांमध्ये अनेक समुद्री जीवांवर नामशेष होण्याचे संकट ओढावत आहे. त्यामध्ये किलर व्हेलचाही समावेश आहे. पाण्यातील पॉलीक्लोरीनेटेड बायफिनाइल्स (पीसीबी)सारखी हानिकारक रसायने त्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. चार दशकांपूर्वी या रसायनाला प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र अजूनही खाद्य शृंखलेच्या प्रथम  जीवांसाठी त्याचा धोका कायम आहे. डेनमार्कमधील आरहूस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जगभरातील 350 किलर व्हेलच्या शरीरातील पॉलीक्लोरीनेटेड बाय‍फिनाइल्स पातळीचे अध्ययन केले. त्यात 50 टक्कयांपेक्षा जास्त पीसीबीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित आढळू आले. त्याच्या एक किलो फॅटी टिश्यूमध्ये (उती) सुमारे 1300 मिलीग्रॅम पीसीबी आढळून आले. दुसरीकडे अवघे 50 मिलीग्रॅम पीसीबी प्राण्यांच प्रजनन आणि प्रतिरोधन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ब्राझिल, ब्रिटन आणि जिब्राल्टर खाडीच्या आसपासच्या जलस्रोतामधील व्हेलवर विलुप्त होण्याचे सर्वात मोठे संकट आहे. ब्रिटिश बेटांमध्ये केवळ दहा किलर व्हेलच उरले आहेत. छोट्या माशांच्या तुलनेत शार्क आणि सीलसारखे मोठे समुद्री खाणार्‍या किलर व्हेलमध्ये पीसीबी जास्त प्रमाणात आढळून आले. साहजिकच त्यांची विलुप्त होण्याची श्क्यता सर्वाधिक आहे. डीडीटी व अन्य कीटकनाशकांसोबतच पीसीबीमुळेही महासागर मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत.