शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

नागपुरात पुरुषाने प्रेग्नन्सीनंतर दिला जुळ्यांना जन्म

Nagpur News जगात वैद्यकीय संबंधित अनेक रहस्यमय आणि आश्चर्यात टाकणारे प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना राज्यातील नागपुरातून समोर आली आहे. येथे एका 36 वर्षीय तरुणाने गर्भवती राहून जुळ्यांना जन्म दिल्याची आश्चर्याची घटना घडली आहे.
 
याहून ही धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या पोटात जन्मापासूनच जुळी मुले वाढत होती. म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्षे प्रेग्नंट होता आणि 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला. हे अजब प्रकरण पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला आहे.
 
नेमकं प्रकरण काय? 
मीडिया रिपोर्ट्सनुसार नागपुरातील 36 वर्षीय शेतकरी यांना पोट सामान्य अधिक फुगलेलं होतं. बहुतेक वेळा त्याच्या वाढत्या पोटाच्या आणि श्वासोच्छवासाच्या समस्येने त्रस्त होता. त्यांना लहानपणापासूनच पोटदुखीची तक्रार होती, पण हळूहळू पोट खूपच वाढू लागलं. त्यांच्या वाढलेल्या पोटाला बघून लोक त्यांना 'प्रेग्नंट' म्हणून चिडवायचे पण गमतीत बोलले सत्य ठरेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल.
 
वयाच्या 36 व्या वर्षी ते खूप अस्वस्थ झाले तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आधीतर डॉक्टरांनी त्यांचा फुगलेलं पोट पाहून त्यात ट्युमर असावा असा अंदाज बांधला आणि ऑपरेशन करण्याचं ठरलं. पण सर्जरी करताना डॉक्टरांना त्याच्या पोटाच्या आत दोन बाळ सापडले आणि ते पाहून डॉक्टरांनाच धक्का बसला. 
 
1999 सालची ही घटना आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे प्राण वाचले असून ते सामान्य जीवन जगत आहे. 21 व्या शतकाच्या सुरूवातीस या वैद्यकीय प्रकरणाची जगभर चर्चा झाली.
 
सुरुवातीला या व्यक्तीच्या पोटात ट्यूमर असल्याचे डॉक्टरांना वाटले, परंतु जेव्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा दोन जुळे गर्भ मृत आढळले. १९९९ सालची ही घटना आहे.
 
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही गर्भातील अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती गर्भ (एफआयएफ) आहे. पाच लाख लाखांत असं एक प्रकरण असतं.