मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (08:57 IST)

चक्क त्याने वडिलांना बीएमडब्ल्यूत पुरलं

नायजेरियात मोसीमधल्या इहाईआला एलजीए या गावात एका तरुणाने चक्क आपल्या वडिलांचं पार्थिव कफनाऐवजी बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये पुरलं. फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आझुबुईके नावाच्या तरुणाने वडिलांचं पार्थिव बीएमडब्ल्यूच्या लक्झुरिअस एसयूव्हीमध्ये पुरल आहे. फेसबुक फोटोवर काही जणांनी कौतुक केलं आहे, तर कोणी टीकेची झोड उठवली आहे. कफनाऐवजी आलिशान कारमध्ये मृतदेह पुरणं हा पैशांचा अपव्यय असल्याची टीका काही जणांनी केली आहे, तर पालकांना जिवंतपणी गाडीतून फिरवा, मृत्यूनंतर सन्मानाने कफनात पुरवा, शो-ऑफ करु नका, असा सल्लाही कोणी दिला आहे.  
 
फोटोनुसार ही गाडी BMW X6 क्रॉसओव्हर असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या कारची सध्याची किंमत 85 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 57 लाख रुपये असल्याची माहिती आहे. भारतात तर बीएमडब्ल्यू कंपनीच्या X6 क्रॉसओव्हर कारची किंमत 1.08 कोटींपासून सुरु होते.