शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (09:52 IST)

धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'

sunil tatkare
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अखेर धाराशिव लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केली. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांचं त्यांना आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.
 
महायुतीमध्ये हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. दररोज नवीन नाव चर्चेसाठी पुढे येत होते. मात्र मागील तीन-चार दिवसापासून चर्चेच्या हालचालींना वेग आला होता. अखेर आज उमेदवाराची घोषणा झाली. 

Edited by -Ratnadeep Ranshoor