मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (19:48 IST)

राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेऊ नये; रामदास आठवले

ramdas adthavale
पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, भाजपासह अनेक पक्ष लवकरच यादी जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. मनसे पक्ष महायुतीत सहभागी होऊ शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. मनसेला महायुतीत घेऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
 
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे की, मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही, लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor