रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2024 (10:07 IST)

ना भुजबळ, ना गोडसे" ; नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला ; नव्या ३ नावांची चर्चा

shinde panwar fadnavis
नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत सुरू असलेला तिढा काही सुटत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमधून पुन्हा उमेदवारी मिळवण्यावर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे ठाम आहेत. तर नाशिकची जागा छगन भुजबळ यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता नाशिकमध्ये महायुतीकडून नव्या नावांची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत कलह सुरू आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असून छगन भुजबळ उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता भाजपकडून नवा सर्व्हे करत तीन नव्या नावांची चाचपणी केल्याची माहिती समोर आली आहे.
 
या नव्या नावांमध्ये भाजपचे नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची नावे चर्चेत आहेत. संघ परिवाराकडून ही चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांना होणारा विरोध पाहता संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवार बदलाबाबत तातडीचा संदेश पाठवल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या गुंता वाढत चालला असून गुढी पाडव्या नंतरच नाशिकच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Edited by -Ratnadeep Ranshoor