मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

निरुपमसह तीन कॉंग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा

मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरीय भागात कॉंग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केल्या प्रकरणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासह तीन नेत्यांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय निरुपम, आमदार पी यू मेहता, आणि एका कॉंग्रेस नगरसेवकाविरोधात कांदिवली पो‍लिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवानगी नसताना लाऊडस्पीकरचा वापर आणि लोकांना एकत्रित करण्‍याच्या आरोपांखाली त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 188 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.