मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. निवडणूक बातम्या
Written By वेबदुनिया|

'आप'चा परिणाम नाही; महाराष्‍ट्रात मनसेच 'बाप'

WD
देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) परिवर्तन घडवून आणले आहे. मात्र महाराष्ट्रात 'आप'चा परिणाम दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हीच 'बाप' असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुरुवारी केले. पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

जनतेची कामे केली नाहीत तर काय परिणाम होतो. हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. कॉग्रेससह अन्य मोठ्या पक्षांनी यापासून धडा घेतला पाहिजे. कॉंग्रेसने जनतेची कामे न केल्याचे त्यांना फळ मिळाले आहे. तसेच दिल्ली 'आप' जो बदल घडवून आणला तो चांगलाच असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे होता, असेही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. परंतु पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो. एका राज्याचा नसतो. त्यामुळे मोदींनी देशातील सर्व राज्यांचा विचार केला पाहिजे. मोदींनी मुंबईत येऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासोबत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतही बोलायला हवे होते, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.