लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार
लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यतान नाकारत येत नाही. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून मे मध्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी आहे.
सध्याच्या लोकसभेची मुदत एक जूनला संपत आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे राष्ट्रपतींकडे पाठवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे.