मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: चंदिगड , सोमवार, 10 मार्च 2014 (11:09 IST)

सविता भट्टी यांचा निवडणूक लढविण्यास नकार

आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार सविता भट्टी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला  आहे. हास्यअभिनेते जसपाल भट्टी यांच्या सविता भट्टी या पत्नी आहेत. 
 
सविता भट्टी यांना 'आप'ने चंदिगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु भट्टी यांनी 'आप'ला एक   ई-मेल पाठवून आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक लढण्यास आपल्याला  कोणतीही आवड नसल्याचे ई-मेलमध्ये म्हटले आहे. 
 
दरम्यान, सविता भट्टी यांना उमेदवारी दिल्यामुळे 'आप'च्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निघत  होता.