शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 12 ऑक्टोबर 2009 (21:35 IST)

बाळासाहेबांचा करिश्मा राजकडे: पवार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याकडे सभेला गर्दी जमविण्याचा करिश्मा होता. तो करिश्मा आता राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. परंतु ही गर्दी जमली म्हणजे मत मिळतात असे नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती श्री.पवार यांनी सांगितले की, मनसेचे तरुणांमध्ये आकर्षण आहे. परंतु त्यांचा जोर ठराविक पट्यांमध्ये आहे. शिवसेना जशी मुंबईत होती त्यानंतर ती राज्यात परसरली. सध्या तशी मनसेची अवस्था आहे. त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनासाठी अजून काही वर्ष जावू द्यावे लागतील.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला ग्रामीण प्रश्नांचे ज्ञान उत्तम आहे. लोकांचा आघाडीवर विश्वास आहे. यावेळीही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असून येत्या दहा वर्षांमध्ये राज्याचा चेहरा बदलणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. आताच्या विधानसभा निवडणुकीत होणार्‍या खर्चाबाबत चिंता व्यक्त करुन अशीच परिस्थती राहिल्यास येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये आपण निवडणूक लढवायची का? नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागले, असे श्री.पवार यांनी सांगितले.