शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

राज्यात चार तासात २१ टक्के मतदान

राज्यभरात मतदानाने वेग घेतला असून गेल्या चार तासात २१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे. निवडणुकीशी संबंधित अधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

आज राज्यातले ७.५६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात मतदानापूर्वी कर्मचार्‍यांवर झालेल्या गोळीबाराचा प्रकार वगळता राज्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू आहे.