शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 12 ऑक्टोबर 2009 (21:34 IST)

राज ठाकरे दलालच: उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राज ठाकरे हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे दलाल आहे, असा आरोप शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला होता. आपल्या या मतावर आपण ठाम असल्याचे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यामुळे प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर दोन्ही भावांमधील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले.

मनसेवरी टीकाबद्दल बोलतांना उद्धव म्हणाले,' व्यक्ती म्हणून नव्हे परंतु पक्ष म्हणून आपल्यावर झालेल्या खोट्या आरोपांना मी उत्तर दिले. कधीतरी त्यांच्याकडून उपस्थित होणार्‍या प्रश्नांना उत्तर देणे गरजेचे होते. त्यात वैयक्तीक टीका केली नाही. ग्रामीण भागात कुठेही मनसेचे नाव घेतले नाही.'

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण मनसेला दिलेले मत वाया गेले हे लोकांना कळले आहे. यामुळे आता बदल होणार असून जनता लोकसभा निवडणुकीच्या प्रकाराची पुनरावृत्ती करणार नाही. मनसेला मत म्हणजे कॉंग्रेला मत यांची जाणीव लोकांनी झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या सभांची गर्दी होते, तशी सोनियाच्या सभेला गर्दी होते, परंतु दुसर्‍या दिवशी पैसे देवून गर्दी जमविल्याचे प्रसिद्ध झाले होते. राजच्या सभेतील गर्दी या पद्धतीची नसेल, परंतु त्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार नाही, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पेटलेला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लोक मतदान करणार नाही. महाराष्ट्रात आता शिवसेना भाजपची सत्ता येणार आहे. आपण शिवसेनेची ताकद आपण राज्याच्या हितासाठी वापरु, अशी ग्वाही उद्धव यांनी दिली.