शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

राज यांचे वडिल मृत्यूनंतरही मतदार!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडिल कै. श्रीकांत ठाकरे यांचे नाव त्यांच्या मृत्यूला सहा वर्षे उलटूनही मतदार यादीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही या माहितीस पुष्टी दिली आहे.

ही बाब राज यांच्या निदर्शनास आणून दिली असता, ते स्वतःही या बातमीने आश्चर्यचकित झाले. हे नाव तातडीने काढून टाकायला हवे. कारण त्यांच्या नावे कोणी बोगस मतदान करायचा अशी भीती त्यांनी व्यक्त केली.