रविवार, 26 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

शिवसेना-कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

जोगेश्‍वरी पूर्व येथे कॉंग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शनिवार जोरदार हाणामारी झाली. एका खासगी वृत्तवाहिनीने विधानसभा निवडणुकीविषयी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली.

भाई जगताप (कॉंग्रेस), संजय चित्रे (मनसे) व रवींद्र वायकर (शिवसेना) हे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम सुरु असताना जगताप यांनी शिवसेना शाखा प्रमुखांवर रिव्हॉल्वर रोखले. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.