गडचिरोलीत मतदान कर्मचार्यांवर गोळीबार
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आज मतदानाला सुरवात होण्यापूर्वी आज सकाळी अहेरी तालुक्यातील कसनसूर येथे मतदान कर्मचार्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी त्यास प्रत्त्युतर दिले नाही. नक्षलवादी दिसत नसल्यास गोळीबार करायचा नाही, असे धोरण ठरविण्यात आले आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात १.२९ लाख पोलिस तर गडचिरोली आणि चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत.