शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

मनसेशी युती करणार नाही- शरद पवार

बाळासाहेबांचा करिश्मा राज यांच्याकडे आहे, असे म्हणणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांच्याशी राजकीय तडजोड करण्याची शक्यता मात्र फेटाळली.

राज्यात कॉंग्रेस आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचेच एक नेते अजित पवार यांनी मनसेची आम्हाला एलर्जी नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही त्यांचीही सत्ता स्थापनेसाठी मदत घेऊ शकतो, असे सुतोवाचही त्यांनी केले होते.

त्यावर पवार यांनी आपण पक्षाचे अध्यक्ष असून आपण घेतो तेच निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदावरून आपल्या पक्षात किंवा आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.