शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

सत्ता 2014 च्या निवडणुकीत: राज ठाकरे

विधानसभेत प्रवेशाची 2009 ची निवडणूक ही सुरवात आहे. परंतु सत्ता ताब्यात घेण्यासाठी सन 2014 ची विधानसभा हे आपले लक्ष्य आहे, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांना नैराश्य आले असल्याचे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यकडून होणार्‍या टीकेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'मनसेवर त्यांच्याकडून होणारी टीका यातून त्यांना नैराश्य आल्याचे स्पष्ट दिसत आहे. ते मनातून हरलेले आहे. शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडली नाही. सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये विकासाची कामे केली नाही. शिवसेना, भाजपकडून खोटी आंदोलन केली गेली. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मनसेवर टीका ते करीत आहेत.'

लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्यावर टीका होत नव्हती. परंतु लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते पाहून माझ्यावर सर्वच पक्ष टीका करीत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याबद्दल त्यांना विचार असता ते म्हणाले,' बाळासाहेबांच्या टीकेवर मी कधी उत्तर दिले नाही आणि देणार नाही. ते माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी प्रतीउत्तर देणार नाही. कारण त्यांच्याबद्दल मला आदर आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल श्रध्दा आहे. यामुळे मी त्यांना प्रतीउत्तर देणार नाही.'

माझ्याकडे नवीन लोक आहे चांगली आहेत. माझ्या हातात आमदारांची ताकद मिळेल तर वीज, रस्ते, पाणी, वाहतूक, बेकायदा झोपड्या हे प्रश्न सोडविणार आहे. मी फक्त मराठी विषय मांडत नाही. अन्न, वस्त्र निवारा या मुद्यांबरोबर मराठी अस्मिता हा विषय मी मांडत आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे येथील मूलभूत गरजांवर दबाव येत आहे. हा माझा मुद्दा आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. सर्व्हेक्षण पाहणीत 11 ते 15 आमदार निवडून येतील याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले,' विधानसभेत जागा मिळेल्या म्हणजे समाधान मिळेल असे नाही. परंतु लोकांची कामे झाल्यावर मला समाधान मिळेल.'