testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमित शाह यांनी सावरगावात फोडला प्रचाराचा नारळ

Last Modified मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:09 IST)
विजया दशमीचा मुहूर्त साधत पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बीडमधील सावरगाव येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावत भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. अमित शाह यांना भगवानगड या ठिकाणी ३७० तिरंगी ध्वज फडकवून आणि ३७० तोफांची सलामी देऊन
मानवंदनाही देण्यात आली.

यावेळी अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच अनुच्छेद ३७० हटवणं शक्य झालं असं म्हणत पुन्हा एकदा भाजपालाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी भगवानगड या ठिकाणी केलं. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात, अशीच मात आपल्याला या निवडणुकीत करायची आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला निवडून द्यायच आहे असे देखील त्यांनी
उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले.
भारतातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३०० पेक्षा जास्त जागा मिळवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७० रद्द करुन अवघा देश एक केला. त्यांनी मागील सत्तर वर्षांमध्ये प्रलंबित होते ते निर्णय पाच महिन्यात मार्गी लावले असं म्हणत अमित शाह यांनी मोदींचं स्तुती केली तसंच त्यांचे हे कार्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांमध्ये पोहचवा असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण
पाकिस्ताननं गेले सहा महिने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमधून ...

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर
युवा सेना प्रमुख व ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे ...

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून ...

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प,  जाणून घ्या सत्य
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. ...