आचार संहिता भंग : अनेक बंदुका, काडतुसे, जिलेटीन जप्त तर राज्यात ४७७ गुन्हे दाखल

code of conduct
Last Modified बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (09:18 IST)
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून अत्यंत काटेकोरपणे तिचे पालन होते. निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे राज्यात
दाखल केली आहेत असे
माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

राज्यात विधानसभा निवडणुका २०१९ जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली आहे, राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असे चित्र आहे. तर दिनांक 21 सप्टेंबरपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नेमके कोणते गुन्हे :
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या 78 प्रकरणात एनपीडीएस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. स्फोटके कायद्यानुसार 3 प्रकरणात, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत 234 प्रकरणात, मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत 25 प्रकरणात तर अन्य विविध अधिनिमांतर्गत 8 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली 626 शस्त्रे, 260 काडतूसे आणि 46 जिलेटीन आदी
स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 937 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 24 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 166 शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 41 हजार 638 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 15 हजार 838 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 9 हजार 117 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 27 हजार 457 प्रकरणात अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आली असून 15 हजार 711 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे. राज्यात 10 हजार 605 तपासणी नाके कार्यरत असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर

सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर
देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील ...

पोलीसांचे कौतुक, अवघ्या तीन मिनिटात शोधून काढला हरवलेला ...

पोलीसांचे कौतुक, अवघ्या तीन मिनिटात शोधून काढला हरवलेला मुलगा
अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावल्याने एका 13 वर्षीय मुलगा घर सोडून ट्रेनमध्ये बसला आहे, ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे : संजय ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे :  संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट
एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती रिव्हरफ्रंटला पोहोचले, 30 मिनिटांत 200 किमी अंतर
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ ...