शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (12:29 IST)

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.
 
या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री.सिंह यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.
 
राज्यातील निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली.
 
यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अनुज जयपुरीयार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड व अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर हे उपस्थित होते.