1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (12:46 IST)

Mahashivratri 2024 महाशिवरात्री कधी आहे ? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्व

Mahashivratri 2024 हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता, म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त भक्तीभावाने व्रत पाळतात आणि शिव-गौरीची पूजा विधीपूर्वक करतात. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटींनी अधिक फल देते. अशात 2024 मध्ये महाशिवरात्रीची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया-
 
महाशिवरात्री 2024 तिथी
पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात 8 मार्च रोजी संध्याकाळी 09 वाजून 57 मिनिटावर होईल. दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 वाजता संपेल. प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते, म्हणून उदय तिथी पाळण्याची गरज नाही. अशात यंदा महाशिवरात्रीचे व्रत 8 मार्च 2024 रोजी पाळले जाणार आहे.
 
महाशिवरात्रि 2024 पूजा मुहूर्त
8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेची वेळ संध्याकाळी 06:25 ते 09:28 पर्यंत आहे. याशिवाय चार प्रहारांचा शुभ काळ पुढीलप्रमाणे आहे.
 
महाशिवरात्रि 2024 चार प्रहर मुहूर्त
रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ - संध्याकाळी 06 वाजून 25 मिनि‍टापासून ते रात्री 09 वाजून 28 मिनिटापर्यंत
रात्रि द्वितीय प्रहर पूजा वेळ - रात्री 09 वाजून 28 मिनि‍टापासून ते 9 मार्च रोजी रात्री 12 वाजून 31 मिनिटापर्यंत
रात्रि तृतीय प्रहर पूजा वेळ - रात्री 12 वाजून 31 मिनि‍टापासून ते प्रातः 03 वाजून 34 मिनिटापर्यंत
रात्रि चतुर्थ प्रहर पूजा वेळ - प्रात: 03.34 ते प्रात: 06:37
 
निशिता काल मुहूर्त - रात्री 12 वाजून 07 मिनिटापासून ते 12 वाजून 55 मिनिटापर्यंत (9 मार्च 2024)
व्रत पारण वेळ - सकाळी 06 वाजून 37 मिनिटापासून ते दुपारी 03 वाजून 28 मिनिटापर्यंत (9 मार्च 2024)
 
महाशिवरात्री पूजा विधी
महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान शिवशंकरांसमोर पूर्ण भक्तिभावाने व्रत करण्याचा संकल्प घ्यावा.
संकल्प दरम्यान व्रत पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा.
शिवाय तुम्ही व्रत कसे पाळाल, म्हणजे फळे खाऊन किंवा पाण्याशिवाय, याचा संकल्प घ्यावा.
त्यानंतर शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी.
सर्व प्रथम भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे.
तसेच 8 भांडी केशराचे पाणी अर्पण करा आणि रात्रभर दिवा लावा. 
शिवाय चंदनाचा तिलक लावावा.
भांग, धतुरा, तीन सुपारीची पाने, भांग, धतुरा, जायफळ, कमळाची पाने, फळे, मिठाई, गोड पान, अत्तर आणि दक्षिणा अर्पण करावी.
शेवटी केशर असलेली खीर अर्पण करावी आणि सर्वांना प्रसाद वाटप करावा.