सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (21:10 IST)

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार, मंत्री आणि खासदार यांना गावात नो ‘एन्ट्री’ ! नाशिक जिल्ह्यात दीडशेपेक्षा जास्त गावांचा निर्णय

maratha aarakshan
नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजेंड्यावर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली.
 
अशातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला असून जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत राज्यातील अनेक गावात राजकीय पुढारी, नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५० हुन अधिक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मराठा बांधव कुणबीचे आरक्षण  काही शरद पवार, नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या नातवांसाठी मागत नसून तो गरजवंत मराठा समाजासाठी मागत असल्याचं म्हणत नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला. मराठा आरक्षणासाठी साठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बळ देण्यासाठी आता लोकप्रतिनिधीना गावबंदी केली जातेय. नाशिक जिल्ह्यातील १५० हुन अधिक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला.
 
गावागावात गावबंदीचे फलक लावले जात असून आमदार, खासदार यांना गावात फिरू दिलं जाणार नाही. याशिवाय सकल मराठा समाज गावागावात जाऊन जनजागृती करत हे आंदोलन अधिक आक्रमक करणार आहे. यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा नेत्यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.