शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : शनिवार, 23 जुलै 2016 (14:24 IST)

24 ते 30 जुलै 2016 भविष्यफल

मेष: आठवड्याच्या सुरुवातीत तुमच्यातील आत्मविश्वास कमी होईल, पण आठवड्यात होणार्‍या प्रगतीमुळे तुमच्यात परत आत्मविश्वास येईल. समाज आणि सार्वजनिक जीवनात तुमचा प्रभुत्व वाढणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत लांबच्या पल्ल्याचा प्रवास कराल. जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारचा करार करू नये. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. तुम्ही धार्मिक संस्थेला दान द्याल आणि जनकल्याणाच्या कार्यांमध्ये भाग घेण्याची इच्छा मनात येईल. 
 
वृषभ: व्यवसायात निरंतर तुम्हाला चढ उतार बघावा लागणार आहे. गणेशजींचा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवणे फारच आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. वडिलांचे आरोग्य तुमचे काळजीचे कारण बनू शकतं. वर्तमान काळात बायकोच्या नावावर केलेली गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे. 25 तारखेला तुमच्यासमोर अचानक खर्च येणार आहे त्यासाठी तयार राहा.जोखीम असलेल्या कामाशी निगडित लोकांना सुरक्षेचा पूर्ण उपयोग करायला पाहिजे. 
मिथुन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला सुख शांतीचा अनुभव येईल. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकतो. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. ज्या लोकांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम ठरणार आहे. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटेल. तुम्ही जन कल्याणाच्या कार्यांमध्ये तुमचे सहकार्य द्याल. विद्यार्थी वर्गाचे लक्ष इतर दुसर्‍या गोष्टींकडे जाईल.
 
कर्क : हा आठवडा फार चढ उतारीच असणार आहे, पण तरीही तुम्हाला शांतीचे अनुभव होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. कृषी, जमीन, घर, सोने चांदी,  फर्निचर, कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टोरेंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या आठवड्यात भरपूर धन लाभ होणार आहे. गणेशजींप्रमाणे तुम्हाला कमी मेहनत करून ही त्याचे जास्त फळ मिळणार आहे. जे लोकं उच्च शिक्षा प्राप्त करत आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा फारच शुभ संकेत देत आहे. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या प्रभावी व्यक्तीशी होऊ शकते. विद्यार्थी ज्ञानासोबत मनोरंजक बाबींमध्ये रुची घेतील. 
सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे अडकलेले कामं पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल व स्वभावात विनम्रता आणावी लागेल. 27 आणि 28 तारखेला थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे, कारण या वेळेस घाई गडबडीत तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता. द्रवपदार्थांच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेत बुध आणि शुक्राचा परिवर्तन योग असल्यामुळे वर्तमान व्यवसायात नूतनीकरण किंवा एखाद्या नवीन मार्गावर तुम्ही पुढे जाल. 
कन्या : या आठवड्यात तुमचा जोष आणि साहस दिवसंदिवस वाढेल. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्योगात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींसाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. 25 आणि 26 तारखेला वित्तीय प्रकरणात सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ अनुकूल असून त्यांच्यात एकाग्रता वाढेल आणि त्यांचे मन अभ्यासात लागेल. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे.
तुला: या आठवड्याची सुरुवात फारच चांगली आहे, आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचा हा काळ आहे. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. शेअर बाजार,कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. भावनेच्या भरात वाहू नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादा प्रवास घडण्याची शक्यता आहे. 29 तारखेला चक्कर आल्याने मेंदूसंबंधित तक्रार, दात आणि डोळ्यांशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: जे जातक आधीपासून आजारी आहे, त्यांची तब्येत या आठवड्यात थोडी सुधारेल. तुम्हाला वाणी आणि आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणत्याही कामासाठी एखाद्यावर विसंबून राहू नका. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. दूरचा प्रवास टाळा. 30 तारखेला वाहन आणि पाण्यापासून दूर राहा.
धनू: या आठवड्याची सुरुवात प्रतिकूल आहे, पण आठवड्याचा शेवटचा टप्पा चांगला जाणार आहे. बर्‍याच काळापासून अडकलेले प्रकरण अचानक संपुष्टात आल्याने तुम्हाला थोडा धीर मिळेल. व्यापार-व्यावसायिकांना दिवस संमिश्र. स्थायी मालमत्तेत तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक करू शकाल. तुम्ही सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. आरोग्याच्या बाबतीत डोळे किंवा तोंडातील आजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासात मन लागेल. 
मकर : या आठवड्याच्या सुरुवातीत कौटुंबिक विवादाचे समाधान होऊ शकतात. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुला राहील. अंतिम टप्प्यात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहे. इतरांवर अधिक विश्वास ठेवू नका. 25 आणि 28 तारखेला उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे. कुटुंब किंवा समाजाकडून एखादी दुःखद बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही सर्व प्रकाराच्या वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कार्यांची प्रशंसा होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होईल, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 
कुंभ : या आठवड्याची सुरुवात फार अनुकूल आहे. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. कर्म स्थळावर सूर्य भ्रमण करत असल्यामुळे नोकरी करणार्‍या लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध उत्तम राहणार आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन, घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या आठवड्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी तुमचा मन अशांत करू शकते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. संतानपक्षाकडून कार्यांमध्ये मदत मिळेल. तुमच्या मेहनतीला यश मिळेल.
मीन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची मानसिक बेचैनी वाढेल. जर शक्य असल्यास स्वतः:च्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या मौज मस्तीसाठी धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार असून त्याचा तुम्हाला फायदाही मिळणार आहे. प्रेम प्रकरणात दोघांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. वीज, विषारी पदार्थ आणि जीवजंतूपासून स्वत:चा बचाव करा.