साप्ताहिक राशी भविष्यफल (15 ते 21.05.2016)
मेष : अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रिय व्यक्ती आणि मित्रमंडळी खर्चात टाकतील.
वृषभ : कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीचे तंत्र उपयोगी पडेल.