बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (20:34 IST)

Happy Holi 2022: होळीच्या रंगांची अ‍ॅलर्जी असेल तर या टिप्स अवलंबवा

होळी हा मिठाई आणि रंगांनी भरलेला आनंदाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी एकमेकांचे वैर विसरून एकमेकांवर प्रेमाने रंग आणि गुलाल उधळतात. पण ज्यांना होळीच्या रंगांची अ‍ॅलर्जी आहे त्यांच्यासाठी हा सण त्रासदायक ठरतो. वास्तविक, होळीच्या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने असल्यामुळे हे त्रासदायी ठरते. आपल्याला ही होळीच्या रंगांची अ‍ॅलर्जी असेल तर आतापासून या टिप्स लक्षात घ्या. 
 
हानिकारक रासायनिक होळीच्या रंगांपासून केस आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स: 
* होळीचे रंग लागताच खाज येण्याची तक्रार असेल तर लगेच खोबरेल तेल लावावे. हा उपाय करूनही आराम मिळत नसेल तर 1 चमचा व्हिनेगर1 कप पाण्यात टाकून त्वचेला लावा. दोन्ही उपाय करूनही आराम मिळत नसेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
* रंग खेळल्यानंतर त्वचा खूप कोरडी आणि रुक्ष वाटू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेला खाज सुटू लागते. अशा स्थितीत लगेचच मलई मध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. त्वचेतील जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल. 
 
* रंगामुळे त्वचा कोरडी झाली असेल तर दह्यात मध आणि हळद मिसळून मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. असं केल्याने  त्वचा खूप मऊ होईल.
 
* होळीच्या दिवशी रंगाच्या दुष्परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरा. होळी खेळण्यापूर्वी फक्त त्वचेवरच नाही तर नखांवरही चांगल्या प्रकारे  लावा. असं केल्याने रंग  त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाही. 
 
* नखांना रंगांपासून वाचवण्यासाठी  नेल पेंट देखील वापरू शकता.
 
* रंगांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मोहरीचे तेल देखील घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावून होळी आनंदाने  खेळा. रंगांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासोबतच त्वचेवर रंगही बसणार नाही. 
 
* होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. कधीकधी रंगांची रसायने सूर्यप्रकाशावर वेगाने प्रतिक्रिया देतात. त्यामुळे  त्वचा कोरडी होऊ शकते. अशावेळी सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करेल.