रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (23:03 IST)

Skin Care Tips :नितळ आणि सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

स्ट्रॉबेरीची चव बहुतेकांना आवडते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेत पण सौंदर्य वर्धक फायदे देखील आहे. स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. याव्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन सी देखील आहे. ते तुमची त्वचा अधिक तरुण बनवते आणि मुरुम काढून टाकते. याशिवाय, ते तुमच्या त्वचेला टोनिंग, त्वचेचा पोत आणि रंगद्रव्य सुधारण्यास मदत करते.नितळ आणि सुंदर त्वचा मिळवायची असेल तर स्ट्रॉबेरी फेसपॅक लावा. कसे बनवायचे जाणून घ्या.
 
मध आणि स्ट्रॉबेरी फेस मास्क-
त्वचा चांगली बनवायची असल्यास हा पॅक बनवा. या साठी स्ट्रॉबेरी घ्या आणि त्यांना मॅश करून पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध घालून मिसळून हा पॅक मास्कवर लावा 15 मिनिट तसेच ठेऊन पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
 
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फेस मास्क-
नितळ आणि स्वच्छ त्वचा मिळवायची असेल तर हा पॅक लावा. हे बनविण्यासाठी सर्वप्रथम स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात एक चमचा कोको पावडर घालून चांगले मिसळून घ्या.  15 मिनिट हा पॅक लावून तसेच राहू द्या . नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
 
स्ट्रॉबेरी आणि क्रीम फेस मास्क- 
हा फेसपॅक त्वचेला अधिक मॉइस्चराइझ  करतो. विशेषतः हिवाळ्यात हा पॅक खूप फायदेशीर आहे. यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून त्याची पेस्ट बनवा. आता थोडे मध आणि मलई घालून मिक्स करा.  चेहरा स्वच्छ करा आणि हा मास्क  चेहऱ्यावर लावा. सुमारे 10-12 मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
 
स्ट्रॉबेरी आणि तांदळाच्या पिठाचा फेस मास्क- 
मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून त्वचा अधिक सुंदर बनवायची असेल तर हा फेस स्क्रब बनवा. यासाठी स्ट्रॉबेरीचे मिश्रण करून पेस्ट बनवा. आता त्यात दही, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. आता चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी त्वचा स्क्रब करा. साधारण 5 मिनिटे असेच राहू द्या. पाण्याने धुवून घ्या.
 
Edited  by - Priya Dixit