शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

वेलचीचे 8 अचूक टोटके

पूजा- पाठ असो, मिठाई बनवायची असो वा मसाले तयार करायचे असो, वेलची अनेक जागी वापरण्यात येते. चहात टाकली तर चहाचा स्वाद वाढतो, तोंडात टाकली तर दुर्गंध दूर होते आणि असेच अनेक फायदे आहेत वेलचीचे. पण आपल्याला माहीत आहे का की याच लहानश्या वेलचीचे काही अचूक टोटकेही आहेत, जे आपल्या जीवनात सुख- समुद्धी घेऊन येतात.
पुढील पानावर पहिला टोटका...

शुक्रावर उपाय: आपला शुक्र कमजोर असल्यास एक लोटा पाण्यात 2 मोठ्या वेलच्या उकळून घ्या.  पाणी अर्ध होईपर्यंत उकळवा. नंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि स्नान करा. याने वाहनासंबंधी प्रकरणात लाभ मिळेल.
स्नान करताना हा श्लोक म्हणा:
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा
या उपायाने सर्व प्रकाराचे रोग आणि दु: ख दूर होतील.
 
पुढील पानावर दुसरा टोटका...
 

शीघ्र विवाहासाठी: विवाहात विलंब होत असल्यास हा उपाय शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी केला जाऊ शकतो. यात मंदिरात गुरुवारी संध्याकाळी दो हिरव्या वेलच्या, पाच प्रकाराचे मिष्टान्न, शुद्ध तुपाचा दिवा आणि जल अर्पित केले पाहिजे. स्त्रियांनी पिवळे गुरुवार आणि पुरुषांनी शुक्रवार केले पाहिजे.
पुढील पानावर तिसरा टोटका...

पती-पत्नीमध्ये प्रेम स्थापित करण्यासाठी: पतीकडून प्रेमाची अपेक्षा असल्यास पत्नीने श्रीकृष्णाचे स्मरण करत शुक्रवारी तीन वेलच्या आपल्या शरीराला स्पर्श करून पदराला किंवा रुमालाला बांधून स्वत: जवळ ठेवाव्या. शनीवारी ह्या एखाद्या पदार्थात घालून नवर्‍याला खाऊ घालाव्या. असे तीन शुक्रवार केल्याने लाभ मिळेल. याव्यतिरिक्त हा उपाय रविवारीदेखील करू शकता. 
पुढील पानावर चौथा टोटका...

शिक्षणात यश मिळवण्यासाठी: शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्तच्या अर्ध्या तासापूर्वी वडाच्या पानावर पाच वेगवेगळे मिष्टान्न आणि दोन वेलची ठेवून हे पिंपळाच्या झाडाखाली श्रद्धापूर्वक ठेवा आणि शैक्षणिक प्रगतीची प्रार्थना करा. घरी येताना मागे वळून पाहू नका. हा उपाय सतत तीन गुरुवारी करावा.
या व्यतिरिक्त हा उपाय ही अमलात आणू शकता. परीक्षेत चांगले मार्क्स हवे असल्यास एक लहान वेलची दुधात उकळवून सात सोमवारी एखाद्या गरिबाला पाजावे.
 
पुढील पानावर पाचवा टोटका...

दारिद्र्य दूर करण्यासाठी: एखाद्या गरीब, असहाय्य किंवा हिजड्याला एक नाणं दान करावे आणि त्याला वेलची खाऊ घालावी. हा उपाय जमत नसल्यास आपण आपल्या पाकिटामध्ये 5 वेलची ठेवा.
पुढील पानावर सहावा टोटका...

सुंदर पत्नी प्राप्तीसाठी: जर तुम्हाला सुंदर बायको हवी असेल तर प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलच्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून गरिबाला दान द्या. हा उपाय कमीत कमी पाच गुरुवारी करावा.
पुढील पानावर सातवा टोटका...

पगारवाढ आणि प्रमोशनसाठी: सतत मेहनत घेत असल्यावरही पगारवाढ होत नसेल किंवा प्रमोशन मिळत नसेल तर रोज रात्री हिरव्या कापडात एक वेलची बांधून उशीखाली ठेवून झोपा. सकाळी ती वेलची एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला देऊन द्या.
पुढील पानावर आठवा टोटका...

कार्यात यश मिळवण्यासाठी: महत्त्वाच्या कामाने बाहेर जात असाल तर सकाळी तीन वेलच्या उजव्या हाताच्या मुठीत ठेवून श्रीं श्रीं उच्चारण करा मग त्यांचे सेवन करून बाहेर जा.