मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2016 (09:40 IST)

अडत्यांचा आज राज्यव्यापी संप

पुणे- बाजार समिती कायद्यातून फळे, भाजीपाला वगळण्याच्या निर्णयाविरोधात राज्भरातील मार्केट यार्डातील अडते, हमाल, तोलारांनी सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बाजार समिती महासंघानेही या बंदमध्ये उडी घेतली आहे.
 
बाजार समिती कायद्यातून फळे, भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनेअडत्यांचा आज राज्यव्यापी संप जाहीर केला. त्या संदर्भात आता एका समितीची नियुक्तीही करण्यात आली आहे. या संदर्भात गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनची बैठक झाली. त्या बैठकीत राज्यातील अडत्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देऊन संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
फळभाज्या नियमनमुक्ती करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या वास्तवाचा विचार केला नाही. तथाकथित शेतकरी नेत्यांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाने शेतकर्‍यांना कोणताही फायदा होणार नाही. शेतकरी सध्या संभ्रमावस्थेत आहेत.