1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 27 जून 2014 (11:24 IST)

'अन्न सुरक्षा तीन महिन्यात लागू करा'

नव्या सरकारसमोर वाढत्या महागाईसोबतच देशात  पावसाने दांडी मारणी आहे. त्यामुळे उद्‍भवलेल्या दुष्काळ सदृश्य  परिस्थितीचेही मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पाच मंत्र्यांशी चर्चा करून  देशातील आढावा केला. तसेच देशातील राज्यांनी तीन महिन्यांत  अन्न सुरक्षा लागू करून कायद्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही  मोदींनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पाचशे जिल्ह्यात आपत्तीनिवारणार्थ  आखण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमालाही मंजुरी देण्यात आली.  देशात पावसाने दांडी मारली असली तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस  पडेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहनसिंह यांनी व्यक्त केली  आहे. बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली,  अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवास, जल संसाधन मंत्री उमा  भारती आणि कृषीमंत्री राजमोहनसिंह उपस्थित होते.