Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 12 डिसेंबर 2010 (05:44 IST)
टूजी घोटाळा: गुंतवणूकदार संभ्रमात!
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा परिणाम देशातील दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकीवर होण्याची भिती उद्योग संघटना एसोचेमने व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसांपासून अब्जावधीच्या या घोटाळ्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, बाजारातील गुंतवणूकीवरही याचा परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
एसोचेमचे अध्यक्ष दिलीप मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील दूरसंचार उद्योगांवर या वादाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.