शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 जानेवारी 2021 (14:18 IST)

पीएम किसान योजनेचे 1364 कोटी बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

पंतप्रधान किसान सन्नाम निधी योजनेंतर्गत 20.48 लाख बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,364 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली.
 
पंतप्रधान किसान सन्नाम निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2019 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकर्यांाना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे कोणत्या अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत यासंबंधी एक माहितीच्या अधिकाराचा अर्ज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करण्यात आला होता. कॉनमवेल्थ ह्यूमन राइट्‌स इनिशिएटिव्ह या संस्थेशी संबंधित असलेल्या वेंकटेश नायक यांनी ही माहिती केंद्र सरकारकडे मागितली होती.
 
या माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालाने सांगितले की, अशा अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांची दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. एक श्रेणी म्हणजे योजनेच्या अटी पूर्ण न करणारे शेतकरी आणि दुसरी म्हणजे आयकर भरणारे शेतकरी. या दुसर्याक श्रेणीतील शेतकर्यां ची संख्या 55.58 टक्के इतकी आहे.