शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (15:47 IST)

'कॅशबॅक' योजनेत मोठी कपात

पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याकरता सुरू केलेल्या 'कॅशबॅक' योजनेत मोठी कपात केली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेल्यावर त्यांना 0.75 टक्क्यांऐवजी फक्त 0.25 टक्के सूट मिळणार आहे. 
 
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 13 डिसेंबर 2016 मध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा पेटीएम केल्यास 0.75 टक्के सूट दिली जात असे. तीन दिवसांमध्ये ग्राहकांच्या खात्यात हे पैसे टाकले जात असे. मात्र कंपन्यांनी आता पेट्रोल पंपांवरील कामगारांना फक्त 025 टक्के सूट देण्याची माहिती दिली आहे. ही कपात ऑगस्ट 2018 पासून लागू करण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट केल्यावर 0.75सूट प्रमाणे प्रति लीटर पेट्रोलमागे 57 पैसे तर डिझेल मागे 50 पैसे सूट मिळत होती. आता मात्र अनुक्रमे 19 पैसे आणि 17 पैसे सूट मिळणार आहे.