बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (19:21 IST)

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या नवे दर

शुक्रवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. जर आपण ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन्ही मौल्यवान धातूंच्या नवीनतम किंमती जाणून घेणे  फायदेशीर ठरेल. सोन्याच्या भावात आज 0.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसह 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 47,908 रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव पुन्हा एकदा 0.34 टक्क्यांनी वाढून 62 हजारांच्या पुढे गेला. आज चांदीचा भाव 62,131 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 
दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले असते.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे देशभरातील सोन्याच्या दागिन्यांची किंमत बदलत  असते.