शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (18:18 IST)

दररोज हजार रुपयांमध्ये IRCTCचे रामपथ यात्रेचे आकर्षक पॅकेज

भारतीय रेल्वेने प्रभू रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी रामपथ यात्रेचे टूर पॅकेज सुरू केले आहे. ही ट्रेन पुण्याहून सुरू होऊन अयोध्येला पोहोचेल. अयोध्येसह 6 धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत. रामपथ यात्रा एक्स्प्रेसमध्ये एसी आणि स्लीपर दोन्ही वर्ग असतील. लोक त्यांच्या सोयीनुसार बुकिंग करू शकतात. ही ट्रेन इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे चालवली जात आहे. रामायण एक्सप्रेसच्या यशानंतर IRCTC ने रामपथ यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
 
IRCTC ने यापूर्वी दोन रामायण यात्रा गाड्या चालवल्या आहेत. त्यात एक एसी आणि सामान्य ट्रेन होती. दोन्ही गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आयआरसीटीसी रामपथ यात्रा एक्सप्रेस पुणे नावाचे पॅकेज सुरू करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रवास 7 दिवस आणि 8 रात्रीचा असेल. यामध्ये भगवान रामाशी संबंधित 6 ठिकाणांना भेट दिली जाणार आहे.
 
रामाशी संबंधित या ठिकाणी ट्रेन जाणार आहे
ट्रेन प्रथम अयोध्येला पोहोचेल, येथून नंदीग्राम, वाराणसी, नंतर प्रयाग, शृंगवरपूर आणि शेवटी चित्रकूटला जाईल.
 
या स्थानकांवर बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगची व्यवस्था
पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खांडवा आणि इटारसी येथून कोणीही ट्रेनमध्ये चढू आणि उतरू शकतो.
 
हे असेल भाडे  
स्लीपर क्लासचे भाडे 7560 रुपये आणि थर्ड एसीचे भाडे 12600 रुपये असेल. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, मुक्काम आणि स्थानिक वाहतूक, मार्गदर्शक इत्यादींचाही समावेश आहे. म्हणजेच स्लीपर क्लासचा रोजचा खर्च एक हजार रुपये आणि एसी क्लासचा खर्च दीड हजाराच्या जवळपास असेल.
 
असे बुक करू शकता
रामपथ यात्रेत प्रवास करणारे लोक www.irctctourism.com तुम्ही घरी बसून बुकिंग करू शकता.