रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

केवळ अडीच तासात मुंबई ते पुणे, पाऊण तास वाचणार

31 मे पासून इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल होत असल्याने आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 2 तास 35 मिनिटांत पूर्ण केला जाईल. या पूर्वी इंटरसिटीला मुंबई ते पुणे प्रवासासाठी 3 तास 17 मिनिटांचा वेळ लागत होता. अर्थात आता जवळपास पाऊण तास वाचणार आहे.
 
31 मे ते 6 जून दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. कारण एक्स्प्रेसला पूश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावण्यात आले आहे. या दरम्यान कुठलीही अडचण न येता गाडी वेळापत्रकानुसार धावली तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाणार आहे.
 
अंतर: 192 किमी
वेळ: सीएसएमटीवरुन 6.45 ला सुटणार, पुण्याला 9.20 ला पोहोचणार 
पुण्याहून संध्याकाळी 6.30 ला सुटणार आणि मुंबईला 9.05 ला पोहचणार.