बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (14:54 IST)

‘होम स्वीट होम’ चा टीजर प्रदर्शित

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते. अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी ‘होम स्वीट होम’ मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत.येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  
 
टीजरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा विषद केला आहे,सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची ‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात.