मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

marathi movie
Last Modified मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (14:52 IST)
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज मराठी चित्रपटांनी थेट अटकेपार झेंडा फडकावला आहे. या यशात अनेकांचे सहकार्य लाभले, आजही लाभत आहे. ज्यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आज हे सुगीचे दिवस अनुभवण्यास मिळत आहेत. आज आंतराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. ही ओळख प्राप्त करून देणाऱ्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र समूह असणाऱ्या 'टाईम्स'ने एका विशेष सन्मानाची घोषणा केली आहे. या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या दहा रत्नांना 'टाईम्स मराठी फिल्म्स आयकॉन्स २०१९' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मराठी सिनेसृष्टीत नाविन्यपूर्ण, आशय संपन्न चित्रपट बनत आहेत. याचेच पडसाद म्हणजे आज मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवण्यासोबतच अगदी ऑस्करच्या पुरस्कारापर्यंतही मजल मारत आहेत. अशा या मराठी सिनेसृष्टीची भुरळ आता बॉलिवूडला पडली आहे. आज अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माता मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांनाही मराठी चित्रपटांनी आकर्षित केले आहे. इतकेच नाही तर मराठी सिनेसृष्टीनेही काही दमदार कलाकार अवघ्या मनोरंजनसृष्टीला दिले आहेत. अशा सर्वच बाबतीत संपन्न असणाऱ्या या मराठी सिनेसृष्टीचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. यात पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागील कलाकार अर्थात लेखक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक,पोस्ट प्रॉडक्शन स्टाफ, साऊंड रेकॉर्डिस्ट, वेशभूषा, रंगभूषा, लाईटबॉय,आर्ट डायरेक्टर, स्पॉटबॉय अशा सगळ्यांचीच मेहनत आहे. याच मेहनतीचे कौतुक करण्याकरता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.

या सोहळ्याला टायटल स्पॉन्सर म्हणून 'टॉप स्कॉलर'चे संजय साळुंखे, पॉवरर्ड बाय श्रीमती शालिनी ठाकरे, को-पॉवरर्ड बाय 'गणराज असोसिएट्स'चे पुरुषोत्तम जाधव, डिजिटल पार्टनर प्लॅनेट मराठीचे अक्षय बद्रापूरकर, व्हेन्यू पार्टनर हयात रिजेंसी, बेव्हरेज पार्टनर युनाइटेड बेव्हरेज लिमिटेड आणि फोटोग्राफर नंदू धुरंधर यांची साथ लाभली आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या ...

जय शिवराय

जय शिवराय
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी​ दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव ...

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि ...