ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल
अनेक दिवसांपासून अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेला भारत-ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी आज अखेर कर्णधार रिकी पॉटींगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा 15 खेळाडूंचा संघ मुंबईत दाखल झाला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या 9 ऑक्टोंबरपासून बंगळूरू येथे सुरू होत आहे. त्याअगोदर काही सराव सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जयपूर येथे जाईल. तर इराणी करंडक स्पर्धेच्या सामन्यानंतर पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे- रिकी पॉंटींग (कर्णधार), डॉऊग बोलिंगर, स्टुअर्ट क्लार्क, मायकेल क्लार्क, ब्रॅड ह द्दिन, मॅथू हेडन, मायकेल हसी, फिल जक्वास, मिचॅल जॉन्सन, ब्रेट ली, सिमन कॅटीच, जसोन क्रेज्झा, ब्रॅक मॅ कगेन, पिटर सिड्डल आणि शेन वॉटसन या खेळाडूंचा समावेश संघात आहे.